अबब ! आता टोमॅटोनंतर जांभूळही महागले, एक किलोला मिळाला इतका भाव..

अबब ! आता टोमॅटोनंतर जांभूळही महागले, एक किलोला मिळाला इतका भाव..

राज्यात सध्या टोमॅटोच्या दरावरून वाद निर्माण झाले असताना सिल्लोड येथील बाजारपेठेत जांभळाला टोमॅटो पेक्षा जास्त भाव मिळत असल्याचे आढळून आले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

अनिल साबळे|सिल्लोड: सध्या राज्यभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना सिल्लोड येथील बाजारपेठेत जांभळाला सुमारे 200 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला आहे. आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व असलेल्या जांभळाला मोठी मागणी असते, त्यामुळे बाजारात जांभूळ खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहे.

राज्यात सध्या टोमॅटोच्या दरावरून वाद निर्माण झाले असताना सिल्लोड येथील बाजारपेठेत जांभळाला टोमॅटो पेक्षा जास्त भाव मिळत असल्याचे आढळून आले आहे. आयुर्वेदिक फळ म्हणून ग्राहकांची जांभळांना पसंती मिळत असल्याने ग्राहक गर्दी करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com