मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर काय म्हणाले जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज (ता. २०) विशेष अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
स्वतंत्र मराठा आरक्षणाचे स्वागत. अधिसूचनेची अंमलबजावणी करा. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा. आम्हाला जे हवं आहे ते मिळवणार. उद्या आंदोलनाची घोषणा करणार. आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण आम्हाला द्या. बहुसंख्य मराठा समाजाला याचा फायदा नाही. सरकारने दिलेलं आरक्षण टिकेल का? गरीब मराठ्यांना याचा फायदा नाही. हरकतींचा विषय पुढे करुन हक्कापासून वंचित ठेऊ नका. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या.
मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून हे आंदोलन आता पर्यंत सुरू आहे. आमचे हक्काचे आरक्षण आम्हला द्यावे. उद्या अंतरवाली मध्ये 12 वाजता मराठा समाजाची निर्णायक बैठक होणार. उद्या पुढीलआंदोलनाची दिशा ठरवणार.
आमचा आणखी विश्वास शिंदेंवर आहे मात्र आम्हाला आता वेळ नाही त्यामुळे आम्ही उद्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार. पुढील आमचे आंदोलन शांततेत होणार आहे. आज पासून सलाईन बंद कुठलाही उपचार घेणार नाही. वेळ आम्ही दिलाय त्यांनी आज सगे सोयरे यांची अंमलबजावणी करायला हवी होती.