Toyota Company : जपानच्या टोयोटा कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, 8 हजार रोजगार निर्मिती होणार
जपानच्या टोयोटा कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. टोयोटो ऑरिक सिटीमध्ये 850 एकरमध्ये प्रकल्प उभारणार आहे. गुंतवणुकीमुळे 8 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मराठवाड्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात महाराष्ट्राचा वरचष्मा कायम, हा प्रकल्प ग्रीनफिल्ड असणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते, आज प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. ऑरिक सिटीमध्ये 850 एकरमध्ये प्रकल्प साकारणार आहे.
टोयाटो किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेडसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य करार होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित असणार आहेत.