Jammu Kashmir
Jammu Kashmir team lokshahi

Jammu Kashmir : शाळेत घुसून दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या

उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांनी (Terrorist) पुन्हा एकदा काश्मिर पंडितांना (Kashmiri Pandit) लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी कुलगाममधील गोपालपोरा भागात असलेल्या हायस्कूलमध्ये घुसून महिला शिक्षिकेवर गोळीबार केला. या घटनेत महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली. शिक्षिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Jammu Kashmir
Sidhu Moosewala Murder Case : सिद्धू मूसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; पोस्टमार्टमधून महत्वाची माहिती उघड

काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरिना यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर आता शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com