Jammu kashmir
Jammu kashmir Team Lokshahi

VIDEO : "काश्मिरमध्ये पुन्हा 1990 सारखी परिस्थिती, तेव्हाही भाजपच्या काळात झाला होता नरसंहार"

काँग्रेसने एक व्हिडिओ जारी केला आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

जम्मू काश्मिर : गेल्या काही आठवड्यांत जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu kashmir) टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ होतेय. त्यावरुन विरोधीपक्षाकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं कौतुक करणारे सध्या होणाऱ्या घटनांवर गप्प का आहेत असा सवाल काँग्रेसने केला आहे. टार्गेट किलींगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांमध्ये (Kashmiri Pandit) भय निर्माण झालं आहे. त्याकाळात असणाऱ्या भाजप (BJP) सरकारममुळेच ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता सुद्धा 1990 सारखी परिस्थिती आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Jammu kashmir
काश्मिरी पंडितांवर हल्ले; गृहमंत्री अमित शाह घेणार बैठक

"काश्मिरी पंडितांना भाजपने पुन्हा स्थलांतराच्या वेदना दिल्या आहेत. आज काश्मीरमध्ये पुन्हा 1990 मधील परिस्थिती आहे, जेव्हा काश्मिरी पंडितांची भाजपच्या सरकारमध्ये हत्या करण्यात आल्या होत्या. आज पुन्हा काश्मिरी पंडितांना पळून जावं लागतंय." असं म्हणत काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकार कठोर पावलं उचलणार असल्याची शक्यता आहे. केंद्रशासित प्रदेशातील सद्यस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com