preparation for election day
preparation for election dayTeam Lokshahi

जालना जिल्हा प्रशासन लागले विधानसभेच्या तयारीला

जालना जिल्हा प्रशासन हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. जालन्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

जालना जिल्हा प्रशासन हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. जालन्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याबाबत आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती दिली.

परतुर, घनसावंगी, जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ही 29 ऑक्टोबर 2024 आहे. तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2024 आहे. तर प्रत्यक्ष 20 नोव्हेंबर 2024 ला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com