Jadeep Dhankhar
Jadeep DhankharTeam Lokshahi

भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जयदीप धनखड यांना उमेदवारी

Jadeep Dhankhar यांची 30 जुलै 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती.
Published by :
Sudhir Kakde
Published on

Jagdeep Dhankhad : भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जयदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नामांकन प्रक्रिया 19 जुलैपर्यंत होणार आहे. त्यानंतर 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 22 जुलैपर्यंत नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांची नावं मागे घेता येतील. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे.

कोण आहेत जगदीप धनखड?

धनखड हे जनता दलाचे प्रतिनिधित्व करत लोकसभेत 1989-91 दरम्यान राजस्थानमधील झुंझुनू (लोकसभा मतदारसंघ) येथून ते खासदार होते. ते 1993-98 दरम्यान 10 व्या विधानसभेत राजस्थानमधील किशनगड, राजस्थान येथून विधानसभेचे माजी सदस्य (आमदार) आणि राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशन, जयपूरचे माजी अध्यक्ष होते. 30 जुलै 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती. धनखर यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थान राज्यातील किठाना या छोट्याशा गावात झाला. त्यांनी आपलं शालेय शिक्षण सैनिक स्कूल, चित्तौडगड येथून पूर्ण केलं. त्यानंतर नंतर राजस्थान विद्यापीठ, जयपूरमधून पदवी प्राप्त केली.

Jadeep Dhankhar
आम आदमी पक्षाचं ठरलं! द्रौपदी मुर्मुंचा सन्मान, पण...

दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास संघर्षमय आहे. अगदी 2009 पर्यंत म्हणजेच त्यांच्या वयाच्या 51 वर्षापर्यंत त्यांचे स्वत:चे घर नव्हते. त्या झोपडीत राहत होत्या. त्या सरकारी विभागात लिपिक म्हणून काम करत होत्या. त्यावेळी एका शाळेत मोफत ज्ञानदानाचे कार्य करत होत्या. त्यांची मुलगी बँकेत कामाला आहे. राजकीय नेत्यांकडे कोट्यावधींची संपत्ती असतांना द्रौपदी मुर्मू यांची संपत्ती आमदार व मंत्री राहिल्यानंतरही आजही 9 लाख 45 हजार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com