Chandrakant Patil
Chandrakant PatilTeam Lokshahi

'महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी अडीच वर्ष काम केलं' चंद्रकांत पाटील

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो लक्षात घेऊन भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आहे. त्यांनी चांगलं काम केलं असतं तर विरोधी पक्ष म्हणून काम केलं असतं.
Published by :
shweta walge
Published on

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो लक्षात घेऊन भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आहे. त्यांनी चांगलं काम केलं असतं तर विरोधी पक्ष म्हणून काम केलं असतं, असा टोला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षाला भाषणा दरम्यान दिला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. जी कामे आम्ही आधी केली ती मोडीत काढली. या सगळ्याचा विचार करून 40 जणांना बाहेर काढलं गेलं. हे सरकार पाडण्यासाठी अडीच वर्ष काम केलं आणि सरकार बनवण्याचा योग आला. मला 2019 ला कोणी काय काय म्हटलं त्याने मला काही फरक पडला नाही. मी त्याकडे खेळ म्हणून बघतो. मला कोण काय बोलतात त्याची काळजी करु नका. असे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, मला पुण्यात आणलं गेलं त्यामागे काहीतरी प्लनिंग आहे. पुणे, सोलापूर, सांगलीत काय घडलं? मला ज्या मिशन साठी पाठवलं गेलं होतं ते मिशन मला पूर्ण करायचं आहे. पुणे, बारामती पाहिजे की नको?

मला आई वडीलांवरून शिव्या दिल्या तरी चालेल पण नरेंद्र मोदी आणि अमित शहांना बोललेलं मला चालणार नाही, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला आहे.

पुण्यात महापालिकेत भाजपचे 100 पेक्षा एक जागा जरी कमी आली तरी मी त्याला यश मानणार नाही. एकनाथ शिंदे यांनी हिम्मत दाखवली, त्यांना आपण अंतर पडू देणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत दोघांच्या मिळून 160 जागा निवडून आल्याच पाहिजे. बहुमतासाठी कुणाच्या मागे जाण्याची वेळ यायला नको. भाजप असो वा शिवसेना आपलीच जागा म्हणून लढवायची आहे असे सांगितले आहे.

Chandrakant Patil
दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधीची रक्कम जमा करणाऱ्यांची नावे जाहीर करावी; अंबादास दानवेंची मागणी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com