it raid
it raidTeam Lokshahi

कोल्हापूर-सोलापूरमध्ये आयटीचे छापे, नाशिकमध्ये अधिकाऱ्याच्या घरातून कोट्यवधी जप्त

नाशिकमध्ये अधिकाऱ्याच्या घरातून कोट्यवधी जप्त
Published by :
Shubham Tate
Published on

it raid : आयकर विभागाने कोल्हापूर (kolhapur) आणि सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आणि मालमत्ता समोर येत आहे. सोलापूर (solapur) पंढरपूरसह (pandharpur) अनेक ठिकाणी साखर कारखान्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये कोल्हापुरातील आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित लोकांवर छापे टाकले आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून आयकर विभागाचे (IT raids) हे छापे सुरू झाले आहेत. पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. आयटीचे हे छापे कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड्यात पडले आहेत. (it raids in kolhapur solapur assets worth crores of rupees seized)

it raid
आर्मी स्कूलमध्ये टीजीटी; पीजीटी शिक्षकांची बंपर भरती, सीटीईटीशिवाय देखील अर्ज करता येणार

या छाप्यांमध्ये त्यांचे कोल्हापूर आणि सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणच्या साखर कारखान्यांशी संबंध आढळून आले आहेत. ज्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे, तो शिरोळ तालुक्यातील पंचायत समितीच्या माजी सभापतींचा पती आहे. गुरुवारी सकाळी आठ ते रात्री उशिरापर्यंत घरावर तसेच जयसिंगपूर येथील आलिशान बंगल्यावर हे छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये काय जप्त करण्यात आले याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. या छाप्यांमुळे संपूर्ण सोलापूर, पंढरपूर आणि कोल्हापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

it raid
अनिल देशमुखांच्या छातीत कळ, जेलमध्येचं पडले बेशुद्ध

दरम्यान, नाशिक येथील आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला आहे. दिनेशकुमार बागुल यांच्या दोन घरांवर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे समोर येत आहे. याआधी गुरुवारी दिनेशकुमार बागुल याला २८ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर चौकशी आणि चौकशीनंतर त्याच्या दोन घरांवर छापे टाकून कोट्यवधी रुपयांची रोकड समोर आली आहे. बागुल यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत एसीबीचे अधिकारी कारवाई करत होते.

बागुल यांनी ठेकेदाराकडे पैशांची मागणी केली होती. यानंतर बागुलला बनावट नोटा घेताना पकडण्यात आले. नाशिकमध्ये झालेल्या या कारवाईनंतर या कार्यकारी अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे समोर येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक अधिक तपास करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com