भारत-चीनमधील चकमकीचा मुद्दा संसदेत गाजणार

भारत-चीनमधील चकमकीचा मुद्दा संसदेत गाजणार

9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. चिनी सैनिक तवांगच्या याग्त्से भागात भारतीय लष्कराची चौकी हटवू इच्छित होते. परंतु, भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन ते परतवून लावले. असे मिळालेल्या माहितीनुसार समजते.

याच पार्श्वभूमीवर आज चीन आणि भारताच्या सैनिकांमधील या चकमकीचा मुद्दा विरोधक संसद अधिवेशनात काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, हा मुद्दा उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीबाबत जोरदार टीका केली आहे. अरुणाचल प्रदेशातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली आणि सरकारने अनेक दिवस देशाला अंधारात ठेवले. संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे का सांगण्यात आले नाही? घटनेचा तपशील अपूर्ण आहे. असे ते म्हणाले.

तसेच ते म्हणाले की, ‘लष्कर चीनला कधीही चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील कमकुवत राजकीय नेतृत्वामुळे चीनचा हा अपमान झाला आहे. संसदेत यावर तातडीने चर्चा होण्याची गरज आहे. मी उद्या या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com