ताज्या बातम्या
Chandrayaan 3 : इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावरील 3D छायाचित्र केले प्रसिद्ध
प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने 'अॅनाग्लिफ' तंत्रज्ञानाचा वापर करून हे चित्र काढण्यात आले आहे.
प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने 'अॅनाग्लिफ' तंत्रज्ञानाचा वापर करून हे चित्र काढण्यात आले आहे. ISROने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने एका खास तंत्राद्वारे काढलेल 3D 'अॅनाग्लिफ' चित्र जारी केले आहे.
इस्रोच्या इलेक्ट्रो-ऑप्टिक सिस्टम्स प्रयोगशाळेकडून विकसित करण्यात आलेल्या NavCam नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून रोव्हरने ही अॅनाग्लिफ छायाचित्र तयार केले आहे. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक छायाचित्र प्रसिद्ध करून ही माहिती दिली.
थ्रीडी चष्म्यातून हे चित्र पाहिल्यास हे चित्र आणखी सुंदर दिसेल. हे दृश्य पाहताना तुम्ही चंद्रावर उभे असल्याचा भास होईल. तसेच या 3D छायाचित्रात, डावीकडील प्रतिमा ही लाल चॅनेलमध्ये आहे, तर उजवी प्रतिमा निळ्या आणि हिरव्या चॅनेलमध्ये आहे. अशी माहितीही इस्रोने दिली आहे.