इसिसच्या निशाण्यावर भारत; देशातील बड्या नेत्यांवर हल्ल्याचा होता प्लॅन

इसिसच्या निशाण्यावर भारत; देशातील बड्या नेत्यांवर हल्ल्याचा होता प्लॅन

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला रशियात अटक
Published on

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला रशियात अटक करण्यात आली आहे. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या एका मोठ्या नेत्याला आत्मघातकी हल्ल्यात ठार मारण्याची योजना त्यांनी आखली असल्याची धक्कादायक योजना आखली असल्याचे समोर येत आहे. रशियन सरकारी एजन्सी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने सोमवारी त्याला पकडल्याची माहिती दिली आहे.

माहितीनुसार, रशियन सुरक्षा एजन्सीने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याची ओळख पटवली. त्यानंतर एफएसबीने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता भारतातील सत्ताधारी पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या बड्या नेत्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समजत आहे.

एजन्सीनुसार, आरोपींनी एप्रिल ते जून या कालावधीत तुर्कीमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले. त्याला आयएस नेत्याने आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती केले होते. तेथे त्याला आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टेलिग्रामद्वारे तो आयएसशी जोडला गेला होता. यानंतर दहशतवाद्याने इसिसच्या निष्ठेची त्याला शपथ दिली होती.

रशियाच्या सरकारी एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दहशतवादी संघटनेने त्याला आवश्यक कागदपत्रांसह रशियाला पाठवले आणि नंतर येथून त्याला भारतात पाठवण्याची व्यवस्था केली होती. यानंतर त्याला सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या नेत्यावर हल्ला करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, दहशतवाद्याने कोणत्या भारतीय नेत्याला मारण्याचा कट रचला होता, याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

दरम्यान, भारतापासून एक दिवस आधी गुप्तचर यंत्रणांनी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला होता. यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पंजाबमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट रचल्याचे सांगण्यात आले होते. अलर्टनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली असून दहशतवादी चंदीगड आणि मोहालीमध्ये हल्ले करू शकतात आणि बसस्थानकांना लक्ष्य करू शकतात, अशी माहिती मिळाली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com