IPL 2024 : चेन्नईच्या मैदानात आज MS धोनी खेळणार शेवटचा सामना? 'त्या' पोस्टमुळं चर्चांना उधाण
MS Dhoni IPL Retirement : आयपीएल २०२४ चा ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याआधी सीएसकेचा माजी कर्णधार एम एस धोनीबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. चेन्नईत होणारा सामना धोनीचा शेवटचा सामना असणार का? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित झाला आहे. धोनीच्या विधानाची पूर्वीची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीबाबत क्रीडाविश्वात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
एम एस धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळत आहे. धोनीनं सीएसकेला आयपीएलमध्ये पाचवेळी जेतेपद जिंकवून दिलं आहे. धोनीच्या नेतृत्तावत सीएसकेनं उत्तम कामगिरी केली आहे. परंतु, धोनीच्या आयपीएलच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे. धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असणार की, धोनी पुढच्या हंगामात पुन्हा मैदानात उतरणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
मी नेहमीच माझ्या क्रिकेटची योजना आखली आहे. रांचीज मी घरेलू मैदानावर माझा शेवटचा वनडे सामना खेळला. माझा शेवटचा टी-२० सामना चेन्नईत होईल, अशी मी आशा करतो. हे पुढच्या वर्षी होईल की येणाऱ्या पाच वर्षात...हे कुणालाच माहित नाही, अशी प्रतिक्रिया धोनीनं यापूर्वी दिली होती.
राजस्थानविरोधात होणाऱ्या आजच्या सामन्यात सीएसकेचा पराभव झाल्यास त्यांच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या अडचणी वाढतील. त्यामुळे धोनीला यंदाच्या हंगामात घरेलू मैदानावर पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही. धोनीनं या हंगामात निवृत्ती घेतली, तर चेपॉकमध्ये त्याचा हा शेवटचा सामना असू शकतो.