Devendra Fadnavis: विदर्भातील सिंचनाच्या प्रकल्पांचा कायापालट होणार; देवेंद्र फडणवीस ट्वीटरवर म्हणाले, "80,000 कोटींच्या..."
Devendra Fadnavis Tweet: वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तातडीनं मंजुरी मिळावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर राज्यपालांनी या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिल्याचं फडणवीसांनी ट्वीटरवर जाहीर केलं आहे.सुमारे 80,000 कोटींच्या या प्रकल्पातून विदर्भातील सिंचनाचे चित्र पालटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात आमचे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं फडणवीस ट्वीटरवर म्हणाले आहेत.
ट्वीटरवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती करण्यासाठी 9 जुलै रोजी मी मा. राज्यपाल रमेश बैस जी यांची भेट घेतली होती. आज त्याला मा. राज्यपालांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे. मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. सुमारे 80,000 कोटींच्या या प्रकल्पातून विदर्भातील सिंचनाचे चित्र पालटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात आमचे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.