IRCTC Down! भारतीय रेल्वेची ऑनलाईन ई- तिकीट यंत्रणा कोलमडली

IRCTC Down! भारतीय रेल्वेची ऑनलाईन ई- तिकीट यंत्रणा कोलमडली

भारतीय रेल्वेची ऑनलाईन ई- तिकीट यंत्रणा कोलमडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारतीय रेल्वेची ऑनलाईन ई- तिकीट यंत्रणा कोलमडली आहे. IRCTC ने ट्विट करून ही माहिती लोकांना दिली आहे. सध्याच्या माहितीनुसार १० तासांपेक्षा जास्त काळ तिकीट बुकिंग होत नाहीये, त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून तक्रारींचा फेरा सुरू आहे.

यावर आयआरसीटीसीने ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काल रात्रीपासून साइट बंद असून ती कार्यान्वित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ॲमेझॉन, Makemytrip इत्यादी सारख्या B2C प्लॅटफॉर्मवरून तिकिटे बुक करता येऊ शकतात. सध्या रेल्वेच्या एकूण आरक्षित तिकिटांच्या बुकिंगमध्ये IRCTC चा वाटा ८०% हून अधिक असताना IRCTC ॲप आणि साइट स्टॉल झाल्यामुळे वापरकर्त्यांना अडचणीला सामोरे जावे लागे आहेत.

तसेच तुमच्या IRCTC ई-वॉलेटमध्ये पैसे असल्यास तिथूनही तिकिटे बुक करता येतील. तर शक्य असल्यास तुम्ही रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून तिकीट बुक करू शकता.तांत्रिक टीम अडचण दूर करण्यासाठी काम करत असून लवकरच तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com