Petrol Price Hike
Petrol Price HikeTeam Lokshahi

Pakistan Petrol Price Hike: पाकिस्तानामध्ये पेट्रोल 30 रुपयांनी महागले

पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण तापले असता आता इंधन दरामध्ये वाढ झाली आहे.
Published by :
shamal ghanekar
Published on

सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) राजकीय वातावरण तापले असता आता इंधन दरामध्ये (Petrol Rate) वाढ झाली आहे. हे दर रात्रीपासून वाढले आहे. इंधन दरामध्ये वाढ झाल्याने यामुळे सर्वसामान्यांना यांचा फटका बसला आहे. तर पेट्रोल आणि डिझेलचा (petrol diesel price) दर प्रतिलीटर 30 रूपयांनी वाढला आहे. तसेच पेट्रोलचा दर वाढल्याने त्याचा परिणाम इतर वस्तूच्या किमतीवर होणार आहे.

इंधन वाढ झाल्याने इस्लामबादमध्ये (Islamabad) एक लिटर पेट्रोलसाठी 179 रूपये 86 पैसे मोजावे लागणार आहे. तर डिझेलसाठी 174 रूपये 15 पैसे मोजावे लागणार असून केरोसिनच्या किंमतीमध्ये 30ची वाढ झाली आहे. यासाठी 155 रूपये 56 पैसे मोजावे लागणार आहेत.

पाकिस्तान डेलीचे पत्रकार हमजा अझहर सलाम (Hamza Azhar Salam) यांनी पेट्रोल वाढीची माहिती दिली आहे. ही माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यांनी केलेले ट्वीट असे आहे की, ''IMF सोबतची चर्चा अयशस्वी झाल्याने आज मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर प्रति लिटर 30 रुपयांनी वाढणार.''

Petrol Price Hike
Nana Patole : 'इंधनावरील दर कपात ही निव्वळ धुळफेक'

वस्तूंवरील सबसिडी बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आग्रह धरला होता त्यानंतर पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल (Mufti Ismail) यांनी गुरुवारी पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीमध्ये ऐतिहासिक वाढ केली असल्याची घोषणा केली आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 30 रुपयांनी वाढ झाल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

इस्माइल यांनी सांगितलं की, सरकारकडे किंमती वाढवण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. तर नव्या दरांमध्ये डिझेलवर आम्हाला प्रतीलिटर ५६ रुपयांचा नुकसान सहन करावं लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

Petrol Price Hike
Petrol-Diesel दर आणखी कमी होणार; केंद्रानंतर राज्य सरकारनेही केली कपात
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com