Indurikar Maharaj vs Gautami Patil : इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर गौतमी पाटील
उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; मालेगावात आज जाहीर सभा गौतमी पाटीलला (Gautami Patil)ओळखत नाही असा माणूस महाराष्ट्रात (Maharashtra)तरी सापडणं कठीण आहे. कारण लहानांपासून तर साठीला टेकलेल्या म्हाताऱ्यानं सुद्धा गौतमीचा डान्स (Dance)पाहिलाय. सुरुवातीला आक्षेपार्ह डान्समुळं ती मोक्कार चर्चेत आली. त्यानंतर तीला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली. आता ती नेहमीच चर्चेत असते. गौतमीचा फॅन फॉलोवर्सही तसाच वाढलाय. तशी तिच्यावर टीकाही झालीच. पण त्यानं तसा काही मोठा फरक पडला नाही, पण आता थेट प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनीच (Indurikar Maharaj)गौतमी पाटीलवर निशाणा साधलाय.
गौतमीसाठी टीका नविन नाही पण आता टीकाकारांमध्ये इंदुरीकर महाराजांचंही नाव देखील सामील झालंय. इंदुरीकर महाराजांनी आपल्या शैलीत गौतमी पाटीलचा खरपूस समाचार घेतला आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे आज इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटील हिचा समाचार घेतला आहे.
वादग्रस्त किर्तनामुळे इंदुरीकर महाराज नेहमी चर्चेत असतात. इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातुन समाजप्रबोधन करतात. मात्र, इंदुरीकरांच्या कार्यक्रमात चिमुकल्यानं गौतमीच्या गाण्यावरच ठेका धरला होता. गौतमी पाटीलच्या अदाकारीनं तरूणाईसह चिमुकली पोरंही बिथरली आहेत. याचा प्रत्यय किर्तनकार इंदुरीकर महाराजांनाही आला.
इंदुरीकर महाराज म्हणाले, तीन गाणे वाजवून तिला तीन लाख आणि आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला म्हणून आमच्यावर आरोप होतो, अशा शब्दात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचं नाव न घेता टीका केलीय.
इंदुरीकर महाराज म्हणाले की, गाण्यांच्या कार्यक्रमात हाणामारी होते, काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिलं जात नाही, असं म्हणत इंदुरीकरांनी गौतमीवर जोरदार टीका केली आहे.