दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखलं; इंडिगोला 5 लाखांचा दंड
नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगो या विमान कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीच्या ग्राउंड स्टाफने रांची विमानतळावर एका अपंग मुलाला हैद्राबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मुलाच्या पालकांनीही विमानात न चढण्याचा निर्णय घेतला. ही घटना 07 मे रोजी घडली. रांची विमानतळावर रांची-हैद्राबाद फ्लाइटमध्ये चढण्यापासून थांबवल्यानंतर, इंडिगोकडून सांगण्यात आलं आहे.
हवाई प्रवासासाठी देशातील सर्वोच्च नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हटलं आहे की, तपासणीत असं आढळून आलं आहे की "इंडिगो ग्राउंड स्टाफला अपंग मुलाची काळजी घेता आली नाही, तसंच मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखलं, त्यामुळे परिस्थिती जास्त संवेदनशील झाली.
"ग्राउंडच्या कर्मचार्यांना मुलाला व्यवस्थित वागणूक देऊन परिस्थिती नियंत्रणात आणता आली असती, मुलाला शांत करून, त्याला बोर्डिंग नाकारले गेले नसते तर अशी अडचण निर्माण झाली परिस्थिती उद्भवली नसती," असं एका निवेदनात म्हटलं आहे.