भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

भारताची वाढत चाललेली लोकसंख्या हे सध्या एक आव्हान बनत चालले आहे. एसएंडपी ग्लोबलने गुरुवारी सांगितले की...
Published by :
Team Lokshahi
Published on

भारताची वाढत चाललेली लोकसंख्या हे सध्या एक आव्हान बनत चालले आहे. एसएंडपी ग्लोबलने गुरुवारी सांगितले की भारत 2030 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. मात्र वाढत चाललेली लोकसंख्या समोर अनेक आव्हाने उभी करत आहे. यामुळे भारतातील मूलभूत सेवा आणि उत्पादनाची व्याप्ती वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

भारताने आपल्या ऊर्जा क्षमतेचा झपाट्याने विस्तार केला आहे, परंतु तिची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि वाढती लोकसंख्या कार्बन-केंद्रित उत्पादन कमी करेल तसेच भरपूर उत्पादनांची मागणी वाढेल. यासोबतच भारत 2024 मध्ये 7.2 टक्के आणि 2025 मध्ये 6.6 टक्के सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीसह जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील.

2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे भारताचे लक्ष्य असून सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि भारत पुढील तीन वर्षांत सर्वात मबनणार असून 2030 पर्यंत ती तिसरी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनू शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com