Piyush Goyal: केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांचं मोठं विधान; म्हणाले; "महाराष्ट्रात दिघी पोर्टजवळ सर्वात मोठा..."
Piyush Goyal Press Conference: देशातील ज्वलंत प्रश्नांना सोडवण्यासाठी हा बजेट महत्त्वपूर्ण आहे. आपल्या युवकांना, गरिबांना, शेतकऱ्यांना, महिलांसह प्रत्येक घटकांसाठी या बजेटच्या माध्यमातून विकसीत भारतासाठी काम केलं जाईल. या अर्थसंकल्पात रोजगारावर अधिक लक्ष देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामण यांनी देशाला पुढं नेण्याचं काम केलं आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांत १२ इंडस्ट्रियल पार्क बनवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात दिघी पोर्टजवळ देशातील सर्वात मोठा इंडस्ट्रियल पार्क बनवण्यात येणार आहे, असं मोठं विधान केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत केलं.
पीयुष गोयल पुढे म्हणाले, देशातील वेगवेगळ्या राज्यांत १२ इंडस्ट्रियल पार्क बनवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात दिघी पोर्टजवळ देशातील सर्वात मोठा इंडस्ट्रियल पार्क बनवण्यात येणार आहे. १२ पार्क्समध्ये सर्वात जास्त उद्योगाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या पार्कमध्ये असेल. कामगारांसाठी रेंटल हाऊसिंग, ई कॉमर्स एक्स्पोर्ट हब्ज, आयकरमध्ये मध्यम वर्गातील वेतनधारक लोकांना करात सूट देण्याबाबत चर्चा झाली.
युवकांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मुद्रा लोन १० लाखांहून २० लाखांपर्यंत केलं आहे. उपभोक्तांना चांगल्या दर्जाचं सामान मिळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून विदेशातून येणाऱ्या प्रोडक्ट्सला अधिक दर्जेदार करण्यात येणार आहे.
एक सामर्थ्य भारताचं मोदी ३.० चा पहिला अर्थसंकल्प नव्या टर्ममध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाला समर्पीत केलं. हा एक असा बजेट आहे, जो देशातील अर्थव्यवस्थेला मजबूत करतो. मागील तीन वर्षांपासून विकासाचा दर जवळपास ८ टक्के राहिला आहे. सर्वात वेगानं जाणारी ही अर्थव्यवस्था आहे. जवळपास तीन वर्षांच्या कालावधीत भारत जगातील सर्वात मोठी तीसरी अर्थव्यवस्था बनेल, असंही पीयुष गोयल म्हणाले.