चीनमधील कोरोनाच्या भारत सरकारचा मोठा निर्णय; या सहा देशांतून येणाऱ्या नागरिकांवर लादले निर्बंध
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताला कोरोना विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने पावलं उचलायला सुरुवात केलीय. चीनसह अमेरिका, जपान दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आज मोठा निर्णय घेऊन सहा देशांतून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.
''१ जानेवारी २०२३ पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय. त्यांना प्रवासापूर्वी आपला रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल'' असं ट्विट आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
बुधवारी अमेरिकेने चीनमधून आलेल्या प्रवाशांना कोरोना चाचण्या बंधनकारक केल्या आहेत. पुढचे ४० दिवस कोरोना विषाणूसंदर्भात महत्त्वाचे मानले जात आहेत. पुढच्या महिन्यात भारतात कोरोनाचं संक्रमण वाढेल, असं सांगितलं जात आहे. मात्र ही लाट जास्त तीव्र नसेल, असंही आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सांगत आहेत.