भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. भारतीय हवाई दलाचं IAF मिग-29 लढाऊ विमान कोसळलं आहे. राजस्थानमधील बारमेरमधील उत्तरलाईजवळील एका शेतात हे लढाऊ विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे.

बारमेर सेक्टरमधील हवाई दलाच्या तळावरून प्रशिक्षण मोहिमेवर हे विमान होते. विमानात वैमानिकासह इतर कोणी नव्हते. पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून विमान अपघाताचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com