GDP
GDP

भारताची GDP वाढ 6.5% पर्यंत घसरण्याची शक्यता

भारताची GDP वाढ 6.5% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी GDP 7 टक्के राहणार असल्याचा दावा 'इक्रा'ने केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारतात विकास दर मंदावणारभारतात विकास दर मंदावणार असल्याचे 'इक्रा' या पतमानांकन संस्थेने दावा केला आहे. भारताची GDP वाढ 6.5% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी GDP 7 टक्के राहणार असल्याचा दावा 'इक्रा'ने केला आहे.

थोडक्यात

  • भारताची GDP वाढ 6.5% पर्यंत घसरण्याची शक्यता

  • संपूर्ण आर्थिक वर्षासाठी GDP 7 टक्के राहील

  • 'इक्रा' या पतमानांकन संस्थेचा दावा

देशाच्या काही भागात झालेली अतिवृष्टी आणि कंपन्यांच्या सुमार तिमाही आर्थिक कामगिरी ही अर्थव्यवस्थेच्या घसरणीस कारणीभूत ठरेल, असे 'इक्रा'चे अनुमान आहे. दर सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत मंदावून ६.५ टक्क्यांच्या पातळीवर घसरण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी तो ७ टक्के राहील, असा 'इक्रा' या पतमानांकन संस्थेने बुधवारी अंदाज वर्तविला.

आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात मात्र आर्थिक क्रियाकलाप वाढण्याच्या अपेक्षेने, २०२४-२५ मध्ये विकासदर वाढीचा अंदाज टक्क्यांची पातळी गाठेल, असे 'इका'ने म्हटले आहे. मुख्यतः निवडणूक काळात सरकारच्या भांडवली खर्चात झालेली घट तसेच शहरी ग्राहकांची मागणीही घटल्याने विकास दरात घसरण होईल, रिझव्हं बैंक मात्र चालू आर्थिक वर्षासाठी ७.२ टक्कांच्या वाढीच्या अंदाजावर ठाम आहे, तर बहुतेक पतमानांकन संस्था आणि विश्लेषकांच्या मते तो टक्क्यांच्या खाली राह शकेल. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलचजावणी मंत्रालयाकडून येत्या २९ नोव्हेंबर रोजी सप्टेंबर तिमाहीतील विकास दरायाचत्तची अधिकृत आकडेवारी जाहीर होईल. विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये वाढीचा दर ६.७ टक्क्यांपर्यंत रोडावला होता. आधीच्या पाच तिमाहीतील ती सर्वात कमी वाढ होती. २०२३-२४ या गत आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ ८.२ टक्के दराने झाली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com