पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला पुढे नेणारी एक गोष्ट म्हणजे महिलांच्या नेतृत्वाखालील विकास. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की नागरी विमान वाहतूक क्षेत्रात भारतामध्ये सर्वात जास्त वैमानिक आहेत. चांद्रयान मोहिमेचे नेतृत्व महिला शास्त्रज्ञ करत आहेत. G20 देश देखील महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे महत्त्व
आज 75000 अमृत सरोवर बनवण्याचे काम सुरू आहे. 18000 गावांना वीज पुरवणे, मुलींसाठी शौचालये बनवणे. आम्ही वेळेच्या आधीच लक्ष्य गाठत आहोत. 200 कोटी लसीकरणाचे काम झाले. हे ऐकून लोकांना धक्का बसला आहे. आम्ही 6G साठी तयारी करत आहोत, असे नरेंद्र म्हणाले.
देशाला नवीन बळ देण्यासाठी आम्ही येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 13-15 हजार कोटी रुपयांसह विश्वकर्मा योजना सुरू करणार आहोत. पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांसाठी 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह सरकार पुढील महिन्यात विश्वकर्मा योजना सुरू करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी- 2014 मध्ये जेव्हा आपण सत्तेत आलो तेव्हा जागतिक आर्थिक व्यवस्थेत आपण 10व्या क्रमांकावर होतो. आज 140 कोटी भारतीयांच्या प्रयत्नाने आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत, असं झालं नाही. भ्रष्टाचाराचा राक्षस ज्याच्या तावडीत देश होता.
भारताच्या ताकदीची ओळख आता जगाला झाली आहे. मी मागच्या दहा वर्षाचा हिशोब देशाला देत आहे. भारतात जी काही प्रगती झाली आहे, त्याकडे संपूर्ण देश पाहत आहेत. शेतकऱ्यांना खतावर १० कोट रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोविड 19 महामारीनंतर, एक नवीन जागतिक व्यवस्था, एक नवीन भू-राजकीय समीकरण आकार घेत आहे. भौगोलिक राजकारणाची व्याख्या बदलत आहे. आज, 140 कोटींची क्षमता नवीन जागतिक व्यवस्थेला आकार देताना दिसते - पंतप्रधान नरेंद्र मोदी
2014 मध्ये तुम्ही मजबूत सरकार बनवले. 2019 मध्ये तुम्ही सरकार स्थापन केले. त्यामुळे मोदींना सुधारणा करण्याची हिंमत आली. यातूनही परिवर्तन दिसून येते.
संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्यास देश सक्षम आहे. देशात माता-भगिनींच्या शक्तीची विशेष भर पडत आहे. ही तुमची मेहनत आहे. शेतकऱ्यांची शक्ती जोडली जात आहे, देश कृषी क्षेत्रात पुढे जात आहे. मला मजुरांचे आणि कष्टकऱ्यांचे अभिनंदन करायचे आहे.
#WATCH | PM Modi to the youth of the nation on 77th Independence Day
"There is no dearth of opportunities in the country. The country has the ability to provide endless opportunities.." pic.twitter.com/hxJ5yQyd0h
हजार वर्षांपूर्वी देशावर आक्रमण झालं. एका राजाचा पराभव झाला. ही एक घटना एक हजार वर्षांच्या गुलामगिरीत भारताला नेऊ शकेल हे वाटलंही नव्हतं. त्यानंतर गुलामी वाढतच गेली. देशावर आक्रमणं वाढली. ही घटना छोटी होती पण एक हजार वर्षांचा प्रभाव पडला. मी आज तुम्हाला हे सांगतो आहे कारण भारताच्या स्वातंत्र्यवीरांनी या कालखंडात देशाच्या स्वातंत्र्याची मशाल पेटती ठेवली. भारतमातेला ज्या बेड्या पडल्या होत्या त्या सोडवण्यासाठी सगळे लोक मग त्या महिला, मजूर, शेतकरी या सगळ्यांनीच स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न प्रत्यक्षात आलं आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारताच्या अमृतकालचे हे पहिले वर्ष आहे. आपण तारुण्यात जगत आहोत. आपण भारतमातेच्या कुशीत जन्म घेतला आहे. माझे शब्द लिहा, या काळात आपण जी पावले टाकू, आपण जे त्याग करू, जी तपश्चर्या करू, त्यातून येत्या एक हजार वर्षांचा देशाचा सुवर्ण इतिहास अंकुरणार आहे.
आज जगात 30 वर्षापेक्षा कमी वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे.याच्या बळावर आपण बरच काही साध्य करु शकतो. आता आपल्याला थांबायच नाहीय, दुविधेमध्ये जगायच नाही, गमावलेली समृद्धी परत मिळवायची आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरच्या घटनेचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपल जीवन गमावलं. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
या वर्षी आपण जो गणराज्य दिवस साजरा करणार आहोत. त्या दिवशी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्र निर्माणासाठी नवी प्रेरणा, नवे संकल्प आपण करत आहोत. आज माझ्या कुटुंबाला म्हणजेच माझ्या देशाला मी सांगू इच्छितो की नैसर्गिक संकटांमुळे देशात अनेक ठिकाणी आपत्ती आल्या. या आपत्ती ज्यांना सहन कराव्या लागल्या मी त्या सगळ्यांच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास त्यांना देऊ इच्छितो.
आज देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन आहे. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी यांचं भाषण सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं.
देश आज 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळा दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पार पडत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील.