Independence Day 2023 : देशाचा आज 77वा स्वातंत्र्यदिन, PM नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर करणार ध्वजारोहण
भारत यंदा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे आणि भारताने स्वातंत्र्याला 77 वर्षे पूर्ण केली आहेत. इंग्रजांच्या १५० वर्षांच्या राज्यानंतर पारतंत्र्याच्या विळख्यातून सुटलेला हा दिवस म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. आपल्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या नगण्य, स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक, आणि आपल्या भारतीयांच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तयारीही पूर्ण झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील.
लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक-
सकाळी 6.55 - संरक्षण सचिव पोहोचतील
सकाळी 6.56 ते 7 - सीडीएस आणि तिन्ही सेना प्रमुखांचे आगमन होईल
सकाळी 7.06 - पंतप्रधान राजघाटावर पोहोचतील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करतील.
सकाळी 7.08 - संरक्षण राज्यमंत्री येतील
सकाळी 7.11 - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येणार
सकाळी 7.18 - पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन आणि त्यानंतर पंतप्रधानांना तिन्ही दलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल
सकाळी 7.30 - पंतप्रधान ध्वजारोहण करतील, रक्षक नॅशनल सॅल्यूट देतील, बँडवर राष्ट्रगीत वाजवंल जाई, त्यानंतर 21 तोफांची सलामी
सकाळी 7.33 - पंतप्रधानांचे देशाला संबोधन
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे लाल किल्ल्यावरील त्यांचे अखेरचे भाषण असेल. विशेष म्हणजे, याआधी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग या तीनच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर किमान दहा वेळा तिरंगा फडकविला आहे. हा मान मिळविणारे माेदी हे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान असतील.