ताज्या बातम्या
Vasai: वसईत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे बेमुदत आंदोलन
वसई संविधान अमृत महोत्सव निमित्त वसईत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मूलभूत अधिकारासाठी बेमुदत आंदोलन दोन दिवसांपासून सुरू आहे.
वसई संविधान अमृत महोत्सव निमित्त वसईत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मूलभूत अधिकारासाठी बेमुदत आंदोलन दोन दिवसांपासून सुरू आहे. वसईच्या उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो आदिवासी महिला-पुरुष वस्तीला राहून हे आंदोलन करीत आहेत.
एकीकडे देशाचा संविधान अमृत महोत्सव सुरू आहे, तर दुसरीकडे मूलभूत हक्कापासून आजही गावपड्यावरील अधिवाशी समाज वंचित आहे.
पालघर जिल्ह्यात 25 हजाराच्यावर अधिवाशी समाजाला रेशनकार्ड नाही, वनपट्टे नावावर केले नाही, अधिवाशी मुलांना मोफत शिक्षण नाही, अनेक अधिवाशी वेठबिगार धनदांडग्यांच्या दहशतीखाली आहेत, रस्ते, पाणी, अन्न, शिक्षण हे मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत ही मागणी घेऊन श्रमजीवी संघटनेचे बेमुद्दत आंदोलन सुरू आहे.