बदलापूरच्या आदर्श शाळेच्या पोलीस बंदोबस्तात वाढ

बदलापूरच्या आदर्श शाळेच्या पोलीस बंदोबस्तात वाढ

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर काल रेलरोको आंदोलन करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर आता बदलापुरातील आदर्श शाळेच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शाळा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

बदलापूर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनकांनी आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com