ताज्या बातम्या
कोरोनात होणाऱ्या मृत्युंमध्ये वाढ की घट? WHOने केला खुलासा
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आता याच पार्श्वभूमीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी मोठा खुलासा केला आहे.
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आता याच पार्श्वभूमीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी मोठा खुलासा केला आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूच्या संख्येत 15 टक्के घट झालीये, तर संसर्गाची नवीन प्रकरणे पूर्वीपेक्षा 9 टक्के कमी नोंदली गेली आहेत. तसेच गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाच्या संसर्गाची 5.3 दशलक्ष प्रकरणं समोर आली आहेत, तर 14,000 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
यासोबतच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले की, कोरोनाची प्रकरणं पूर्णपणे नोंदवली जात नाहीयेत. कारण अनेक देशांनी त्यांची चाचणी कमी केली आहे आणि व्हायरसवर देखरेख ठेवण्यासाठी 'प्रोटोकॉल' योग्य पद्धतीने पाळले जात नाहीत.