ST Mahamandal
ST MahamandalTeam Lokshahi

एसटी महामंडळाच्या उत्पन्नात एका दिवसात 12 कोटी रुपयांची वाढ

कोरोनाच्या प्रदिर्घ काळानंतर प्रथमच मंगळवारी महामंडळाचं उत्पन्न दिवसाला 25 कोटी 47 लाखांवर पोहोचलंय. तर एसटी महामंडळाच्या दिवसाच्या सरासरीच्या उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

मुंबई : कोरोनाच्या प्रदिर्घ काळानंतर प्रथमच मंगळवारी महामंडळाचं उत्पन्न दिवसाला 25 कोटी 47 लाखांवर पोहोचलंय. तर एसटी महामंडळाच्या दिवसाच्या सरासरीच्या उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. एसटी महामंडळाचा 10 वर्षांतला आर्थिक उच्चांकी आकडा वाढत असून, एसटीची आर्थिक घडी रुळावर येण्यास होणार मदत होणार आहे.

ST Mahamandal
भारत जोडो यात्रा 'या' दिवशी महाराष्ट्रात येणार

एसटीच्या ताफ्यात असलेल्या 13 हजार गाड्यांमधून येणारे सर्वाधिक उत्पन्न पाहायला मिळत आहे. तर एसटी संपानंतर पुन्हा एकदा प्रवासी एसटीकडं परतत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट दिसून येतंय. संप काळात एसटीपासून प्रवासी वर्ग दुरावला होता. तर 30 ऑक्टोबरला दिवसाला 23 कोटींपर्यंतचं उत्पन्न जमा झालं होतं.

दिवाळीत तिकीटात केलेल्या 10 टक्के भाडेवाढीमुळं एसटी महामंडळाचं उत्पन्न 8 कोटींनी वाढलं. एसटी महामंडळाचं दर दिवसाला सरासरी उत्पन्न 15 कोटींच्या जवळपास आहे. 1 नोव्हेंबरपासून पुन्हा तिकीट दर जैसे थे होते, मात्र प्रवासी वर्ग पुन्हा एसटीकडे परतत असल्यानं उत्पन्न 20 कोटींपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com