ताज्या बातम्या
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दरात 'इतक्या' टक्क्यांची वाढ
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मुंबई परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळांच्या मूर्तीचे आगमन होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मिठाईच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत मिठाईच्या दरात जवळपास 25 ते 30 टक्के वाढ झालेली आहे. मोदक, लाडू, मिठाई, सुक्या मेव्याच्या दरात वाढ झाली आहे. बाप्पाच्या आगमनाआधीच मोदक-मिठाईचा दर वाढलेला पाहायला मिळत असून तसेच तांदळाच्या पिठाचे दर तब्बल 140 रुपये किलोवर गेलं असल्याची माहिती मिळत आहे.