राज्यात हिवताप, डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ
थोडक्यात
राज्यात हिवताप, डेंग्यू रुग्णांच्या मृत्यूंत वाढ
गडचिरोलीत हिवतापामुळे सर्वाधिक 12 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू
राज्यात हिवताप, डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांच्या संख्याही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा नोव्हेंबरपर्यंत हिवतापाने 20 जणांचा, तर डेंग्यूने 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत हिवतापाचे 14 हजार 319 रुग्ण सापडले होते, तर 13जणांचा मृत्यू झाला होता. तर आता 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत हिवतापाचे 18 हजार 477 रुग्ण सापडले असून, 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
यातच गडचिरोलीत हिवतापामुळे सर्वाधिक 12 रुग्णांचा मृत्यू तर मुंबईत आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.