ताज्या बातम्या
Thane : ठाणे जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
ठाणे जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सायली सोलकर - वैराग, मुंबई
ठाणे जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे महिन्यात 17 तर जून महिन्यात 21डेंग्यूचे रुग्ण आढळले. तर सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पालिका क्षेत्रात 44 रुग्णांची चाचणी करण्यात आली असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार समजते.
यासोबतच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन महिन्यांत डेंग्यूच्या जवळपास 38 रुग्णांची तर ठाणे पालिका क्षेत्रांत 26 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांना आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.