Metro: गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या फेरीत वाढ; जाणून घ्या वेळापत्रक

Metro: गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या फेरीत वाढ; जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई मेट्रो वनला सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयी वाढवण्यासाठी मेट्रो सेवेचे तास वाढवण्याची घोषणा केली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मुंबई मेट्रो वनला सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयी वाढवण्यासाठी मेट्रो सेवेचे तास वाढवण्याची घोषणा केली. ही सेवा गणेश उत्सवासाठी आहे. 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या आणि 17 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू राहणाऱ्या, उशिरा-रात्रीच्या उत्सवांसाठी सेवा नंतर उपलब्ध असतील. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी ही घोषणा केली. उत्सवाच्या काळातील वाढीव फेऱ्या चालविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.

गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री 11 ऐवजी रात्री 11:30 वाजता सुटेल.

अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ 30 मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनल्सवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री 11:15 आणि 11:30 वाजता सुटतील. गुंदवली ते दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान दोन वाढीव फेऱ्या सुरू केल्या जातील. या विस्तारामुळे प्रमुख स्थानकांवर एकूण 20 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील.

दहिसर पूर्व – अंधेरी पश्चिम अशा चार अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. रात्री 10:53, 11:12, 11:22 आणि 11:33 या वेळेत या फेऱ्या होणार आहेत. तर दहिसर (पूर्व) – गुंदवली दरम्यान चार अतिरिक्त फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. रात्री 10:57, 11:17, 11:27 आणि 11:36 दरम्यान या फेऱ्या होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com