iNCOVACC Intra-Nasal Covid Vaccine
iNCOVACC Intra-Nasal Covid VaccineTeam Lokshahi

भारत बायोटेककडून 'इन्कोव्हॅक' कोविड लशीला मंजुरी

भारत बायोटेकनं दावा केलाय की, iNCOVACC ही जगातील पहिली Nasal COVID vaccine आहे. ज्याला प्रायमरी सीरीज आणि हेट्रोलगस बूस्टर डोसच्या रूपात मान्यता देण्यात आली आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

नवी दिल्ली : भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडकडून सोमवारी (दि.28) इन्कोव्हॅक या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लशीला मंजूरी देण्यात आलीय. इन्कोव्हॅक ही नाकाद्वारे दिली जाणारी जगभरातील पहिली कोविड लस बनल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय.

iNCOVACC Intra-Nasal Covid Vaccine
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर

कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रित वापरासाठी असलेल्या सर्व प्रौढांसाठी या लशीचे दोन्ही डोस प्रायमरी सीरिज आणि हेट्रोलगससाठी मंजुरी दिली आहे. म्हणजेच देशभरात 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत या लशीचा डोस दिला जाऊ शकतो.

भारत बायोटेकच्या माहितीनुसार, स्टोरेज आणि वितरणासाठी 'इन्कोव्हॅक' दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येते. नाकातून दिली जाणारी ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनुसार खास विकसित करण्यात आलीय. अमेरिकेतील सेंट लुईस, मिसूरी येथील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या भागीदारीत ही लस विकसित केली आहे.कंपनीच्या माहितीनुसार, लशीची तीन टप्प्यांत क्लिनिकल चाचणी करण्यात आली. ही लस घेणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्याही घेण्यात आल्यात. यशस्वी परिणामांनंतर ही लस नाकावाटे देण्याचं निश्चित करण्यात आलंय. या लशीच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि क्लिनिकल ट्रायलसाठी अंशतः केंद्र सरकारकडून निधी देण्यात आला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com