विरारमध्ये माती खचून महापालिकेच्या गार्डनची भिंत कोसळली

विरारमध्ये माती खचून महापालिकेच्या गार्डनची भिंत कोसळली

याआधी देखील त्याच ठिकाणी अशीच दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा दुपारच्या सुमारास माती खचून महापालिकेच्या गार्डनची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

विरार|संदीप गायकवाड: विरार पूर्वेला वसई विरार महापलिकेचं मातृ छाया उद्यान आहे. यांच्या लगत असलेल्या सूर्य किरण इमारतीचे रीडेव्हलपचे काम सुरू होते.6 जुन रोजी माती खचून भिंत मजूर महिलांच्या अंगावर पडून दुर्दैवी तीन महिलांचा मृत्यू झाला होता तर एक महिला जखमी आहे.

पुन्हा एकदा माती खचून महापलिकेच्या गार्डनची भीत कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून महापालिकेच्या गार्डनची भिंत पडून त्या ठिकाणची बाकडे व इतर खेळण्याची साहित्य मातीखाली दबून मोठे नुकसान झाले आहे.बाजूलाच लाईटची मुख्य डिपी आहे.माती खचून त्याचेही नुकसान होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

परत एकदा माती खचून नुकसान झाल्याने पालिका प्रशासन मात्र याकडे का दुर्लक्ष करत आहे. असा प्रश्न आता प्रहार जनशक्ती पक्षाचे वसई तालुका अध्यक्ष दुशान पाटील यांनी विचारला आहे. सकाळ सायंकाळच्या वेळी या गार्डनमध्ये लहान मुले खेळण्यासाठी येतात. तर त्यावेळी माती खचली असती तर मोठी जीवितहानी देखील यामध्ये झाली असती. विरार पोलिसांनी बिल्डर,आर्किटेक,ठेकेदार यांच्यावर मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करून ठेकेदार व बिल्डरला अटक करण्यात आलं आहे. एवढी मोठी दुर्घटना होऊन देखील पालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याने बिल्डरच्या अर्थपूर्ण व्यवहारात पालिकेचे अधिकारी बांधले गेले आहेत का? असा सवाळ आता उपस्थित केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com