Robbery
RobberyTeam Lokshahi

Crime| दोन मिनिटांत तब्बल दोन करोड रुपयांचा मुद्देमाल साफ

बिहारच्या मोतीहारीमधली धक्कादायक घटना
Published by :
Team Lokshahi
Published on

बिहारच्या (bihar) मोतीहारीमध्ये (motihari) दरोडेखोरांनी एका सोन्याच्या व्यापाऱ्याच्या दुकानावर दरोडा टाकला. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) व्हायरल झाल्यानंतर या दरोडेखोरांनी अवघ्या दोन मिनिटात तब्बल दोन करोड रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बुधवारी संध्याकाळी मोतीहारीच्या चकिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीगंज परिसरातील प्रमुख बाजारात देवीलालप्रसाद ज्वेलर्स (Devilal Prasad Jewelers) नावाच्या सोन्याच्या दुकानात घुसून दुकानदार आणि ग्राहकांना बंदुकीचा धाक दाखवत चोरटयांनी ही लूट केल्याची बातमी समोर आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात दिलेल्या अधिक माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज मध्ये ठीक ५ वाजून ३२ मिनिटांनी ८ चोरटे या दुकानात शिरले आणि दुकानात प्रवेश करताक्षणी यापैकी काही जणांनी गोळीबार केला. गोळीबाराने दुकानात उपस्थित असलेल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यापैकी एका आरोपीने दुकानमालकाच्या दोन मुलांवर गोळीबार केला आणि त्यांना जखमी करून तब्बल ५५ लाख रुपये लुटले.

याचवेळी माझ्या दुकानातील १ किलो सोन्याचे दागिने, ६० ते ७० किलोचे चांदीचे दागिने आणि तब्बल १ करोड रुपये रोकड चोरटयांनी लुटल्याची माहिती दुकानमालकाने यावेळी दिली आहे. या आठ चोरटयांनी मिळून केवळ दोन मिनिटात दोन करोड रुपयांचा दरोडा (Robbery) टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच मोतीहारी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आता पोलीस दरोडेखोरांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर या गुन्हेगारांना पकडू असे सांगितले आहे.

Robbery
Mumbai Local : पूर्वमोसमी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मात्र या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बिहारमध्ये व्हायरल झाल्याने राज्यभर या घटनेची चर्चा सुरु आहे. दरोडेखोरांनी अवलंबलेल्या या दरोड्याच्या पद्धतीची मात्र चौक चौकात मोठ्या चवीने चर्चा सामान्य लोक करत आहेत आणि दिवसाढवळ्या असा गुन्हा घडल्याने बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील चव्हाट्यावर आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com