Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, विविध अभियांत्रिकी यांच्यासह देखभालीची कामे करण्यासाठी आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांना रविवारी म्हणजेच आज बाहेर पडण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे: माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी: सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत
परिणाम: जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील, जी माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि 15 मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
कुठे: बोरिवली –गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी: सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत
परिणाम: बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर, काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. यासह हार्बर मार्गावरील अंधेरी – बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक 1,2,3, आणि 4 वरून कोणतीही लोकल सेवा धावणार नाही.
हार्बर रेल्वे
कुठे: पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी: सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 वाजेपर्यंत
परिणाम: हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबई ते पनवेल/बेलापूरच्या दिशेने सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 वाजेपर्यंत डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तसेच सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.