Mahim Dargah : माहिम समुद्रात अवैध बांधकाम; माहिम दर्गा ट्रस्टची पहिली प्रतिक्रिया

Mahim Dargah : माहिम समुद्रात अवैध बांधकाम; माहिम दर्गा ट्रस्टची पहिली प्रतिक्रिया

गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा पार पडली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रातील दर्गा अवैध असल्याचा आरोप केला. राज ठाकरे यांनी भाषणाच्या दरम्यान एक व्हिडिओ दाखवला.

हा व्हिडिओ दाखवताना राज ठाकरे म्हणाले की, "दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. इथं नवीन हाजीअली तयार होत आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करण्यात येणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली पाहिजे.

यावर माहिम दर्गा ट्रस्टची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी सांगितले की, ही जागा ऐतिहासिक आहे.त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं. ही 600 वर्ष जुनी आहे. त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. नवीन बांधकाम झालं असेल तर सरकारने कारवाई करावी असे माहिम दर्गा ट्रस्टने सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com