IAS Sanjeev Khirwar
IAS Sanjeev Khirwar team lokshahi

IAS Sanjeev Khirwar : कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढणाऱ्या IAS दाम्पत्याला केंद्राचा दणका

आयएएस अधिकारी संजीव खिरवार हे दिल्लीत प्रमुख सचिवपदावर कार्यरत आहेत
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

दिल्लीचे महसूल खात्याचे मुख्य सचिव संजीव खिरवार (sanjeev khirwar) आणि सनदी अधिकारी (IAS) असलेल्या त्यांच्या पत्नी रिंकू दुग्गा (rinku dugga) यांची गुरूवारी केंद्र सरकारने (Central Govt) बदली केली. केंद्र सरकारकडून या अधिकाऱ्याची थेट लडाखमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर त्याच्या पत्नीची बदली अरूणाचल प्रदेशात करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी संजीव खिरवार हे दिल्लीत प्रमुख सचिवपदावर कार्यरत आहेत.

IAS Sanjeev Khirwar
Sambhajiraje Chhatrapati : राज्यसभा निवडणूक लढवणार की नाही?

गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळ होताच त्यागराज स्टेडियममध्ये जातात आणि संपूर्ण मैदानाचा ताबा घेतात. खिरवार मैदानात येताच खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना बाहेर पाठवले जायचे. एका प्रशिक्षकाने असं म्हटलं होतं की, 'पूर्वी खेळाडू रात्री ८ ते ८.३० वाजेपर्यंत सराव करायचे. पण, आता त्यांना सायंकाळी ७ वाजताच स्टेडियम रिकामं करायला सांगितलं जातं. कारण तिथे IAS अधिकारी त्यांच्या कुत्र्यासोबत फिरायला येतात. यामुळे आमच्या प्रशिक्षण आणि दैनंदिन सरावात अडथळे निर्माण होतं आहे.'

IAS Sanjeev Khirwar
Mumbai Local : पूर्वमोसमी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ही बातमी समोर आल्यानंतर संजीव खिरवार यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेची दखल घेत अहवाल मागवला होता. त्यानुसार मुख्य सचिवांनी गुरुवारी संध्याकाळी यासंबंधीचा अहवाल गृहखात्याला सोपवला. त्यानंतर संजीव खिरवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे अनेकजणांनी कौतुक केले आहे. या घटनेनंतर आता त्यागराज स्टेडिअमच्या सुरु ठेवण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता हे स्टेडिअम रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहील.

किरण बेदी संतापल्या

केंद्र सरकारच्या या निर्णयावर माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी काही शंका उपस्थित केल्या. संजीव खिरवार दोषी आढळले असतील तर त्यांची दुसऱ्या केंद्रशासित प्रदेशात बदली का केली? ते सेवेसाठी सक्षम आहेत किंवा नाही, हे स्पष्ट होईपर्यंत त्यांना रजेवर पाठवायला हवे होते, असे किरण बेदी यांनी म्हटले.

नेमका प्रकार काय?

दिल्लीच्या त्यागराज स्टेडिअममध्ये यापूर्वी ८ ते ८.३० पर्यंत सराव केला जायचा. पण गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी ७ वाजताच खेळाडू आणि प्रशिक्षकांना मैदानाबाहेर पाठवले जात होते. कारण संजीव खिरवार यांना त्यांच्या श्वानाला मैदानात फिरवायचे असते. यामुळे आमच्या सरावावर परिणाम होतो. गेल्या सातपैकी तीन दिवस संध्याकळी ६.३० ला सुरक्षा रक्षक सर्वांना मैदान रिकामे करण्यास सांगतात, अशी व्यथा येथील खेळाडूंनी मांडली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com