मी कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोडणार नाही, खडसेंकडून घरवापसीचे खंडन
मंगेश जोशी , जळगाव
एकनाथ खडसे यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे व त्यातच फोन द्वारे देखील एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे मात्र या चर्चेमुळे एकनाथ खडसे हे भाजपात घरवासी करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेचे एकनाथ खडसे यांनी स्वतः खंडन केले असून कुठल्याही परिस्थितीत आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चेमुळे एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधाण आले होते तर राजकीय वर्तुळातही ही चर्चा चांगली रंगली होती या चर्चेमुळे एकनाथ खडसे हे भाजपत घर वापसी करणार का ? एकनाथ खडसे व अमित शहा यांच्यात काय चर्चा झाली ? व खडसेंच्या घरवापासीची चर्चा कशी व कुठून सुरू झाली ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र कठीण काळात ज्या पक्षाने मला साथ दिली त्या राष्ट्रवादीला काँग्रेसला मी कुठल्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी लोकशाहीशी बोलताना स्पष्ट केले आहे.
एकनाथ खडसे यांच्या घरवापसी ची चर्चा कुठून व कशी ?
जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसेंच्या बालेकिल्लात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता, एकनाथ खडसे पुन्हा भाजपा मध्ये येतात की काय अशी शक्यता देखील आमदार चंद्रकांत पाटील यांनी वर्तविली होती. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजप घरवापसी करणार असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधान आले होते. तर या भेटीबाबत एकनाथ खडसे यांच्या स्नुषा तथा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी देखील एकनाथ खडसे व अमित शहा यांच्यात फोन द्वारे झालेल्या चर्चेला दुजोरा दिला. मात्र चर्चा काय झाली हे सांगणे टाळत या चर्चेचा सस्पेन्स कायम ठेवला .
घरवापसीच्या चर्चेवरून एकनाथ खडसेंचा शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा
घरवापासीच्या चर्चेवरून एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत चंद्रकांत पाटील गोधडीत होते तेव्हापासून अमित शहा व नरेंद्र मोदी यांचा माझा परिचय असल्याचे म्हटले आहे, अमित शहा यांना मी एक वेळा नाही तर अनेक वेळा भेटलो आहे आणि यापुढे ही भेटणार आहे त्यामुळे याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या परवानगीनेच मी अमित शहा यांना भेटणार होतो, मात्र भेट न होऊ शकल्याने फोन द्वारे चर्चा झाली आहे. असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान माझ्या वैयक्तिक कामासाठी मी अमित शहा यांची भेट घेणार होतो व त्या बाबतच त्यांच्याशी फोनद्वारे चर्चा झाली त्यामुळे भाजपा घर वापसी करणार असल्याची चर्चा ही केवळ पोकळ चर्चा माझ्यावर अन्याय होत असतांना ज्या पक्षाने कठीण काळात मला साथ दिली व मला आमदारकी दिली त्या पक्षाला मी कधीही सोडणार नसल्याचे देखील एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.