“मी तुमची माफी मागते, कारण विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी…” प्रियांका गांधी असं का म्हणाल्या?
एकीकडे साऱ्या देशाच लक्ष भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर आहे. देशभरातील वातावरण क्रिकेटमय झालं आहे. प्रत्येक क्रिकेट चाहता टीव्हीसमोर बसून सामन्यातील प्रत्येक अपडेट बघत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याऐवजी सभेला यावं लागल्याने उपस्थितांची माफी मागितली.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना असूनही तुम्ही सर्व लोक मला ऐकण्यासाठी सभेला आला आहात. यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. तुम्हाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी सभेला यावं लागलं आणि त्रास झाला त्यासाठी मी माफी मागते.
आपला क्रिकेट संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि विजयात मोठमोठे विक्रम निर्माण करत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघ आपल्या एकतेचं प्रतिक आहे. त्यात सर्व धर्मातील, सर्व प्रदेशांमधील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे खेळाडू आहेत. ते सर्व एकजुट होऊन आपल्या देशासाठी लढत आहेत,” असं मत प्रियांका गांधींनी व्यक्त केलं.
त्यामुळे आज इथं सभेत उभं राहून सर्वात आधी आपण भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करू. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट टीम इंडिया. माझ्याबरोबर बोला, ‘जितेगा इंडिया, असंही प्रियांका गांधींनी नमूद केलं.
दरम्यान, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल सामना सुरू असून भारताची खराब सुरूवात झाली. वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ आपली संपूर्ण ताकद लावताना दिसतील.