“मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देतोय; संजय राऊत म्हणाले...
कर्नाटकमधील भाजपा सरकारचे प्रमुख, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे. असे त्यांनी ट्विट केलं आहे. तसेच ते म्हणाले की, “कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या समाविष्ट केले पाहिजेत”. तसेच २००४ पासून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांना यश आलेलं नाही आणि मिळणारही नाही. आम्ही कायदेशीर लढ्यासाठी तयार आहोत असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. ‘हे घेऊ, ते घेऊ’ ही तुमची बकबक बंद करा. १०६ हुतात्मे झाले आहेत. आम्ही आणखीन हुतात्मे देऊ. रक्त सांडू. आम्हाला तुरुंगाची भीती नाही. आमचं सरकार जरी सिलेंडर वर करून गुडघ्यावर बसलं असलं, तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे हे विसरू नका” तसेच ते म्हणाले की, बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगलाय, आम्हीही भोगू. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी शिवसेनेकडून इशारा नाही देत, धमकी देतोय समजा. असा इशारा संजय राऊत यांनी बोम्मई यांना दिला आहे