यंदाही मुलींचीच बाजी! बारावीचा निकाल जाहीर
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) कधी जाहीर होतो याची प्रतीक्षा पालक, विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. अखेर आज बारावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी माहिती दिली.
राज्यातील बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.35 इतकी आहे. तर मुलाची 93.29 टक्के आहे. याहीवर्षी राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 97.21 टक्के तर सर्वात कमी मुंबई विभागाचा 90.91 टक्के एवढा निकाल लागला आहे.
बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या होत्या. आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.
विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल
पुणे - 93.61, नागपूर- 96.52 , औरंगाबाद- 94.97 , मुंबई- 90.91, कोल्हापूर- 95.07 , अमरावती-96.34, नाशिक-95.03 , लातूर-95.25, कोकण -97.22 .
अधिकृत संकेतस्थळ -