घरात तुम्ही किती कॅश ठेऊ शकतात?
अर्पिता मुखर्जीच्या घरी 50 कोटी रोकड आणि 6 किलो सोने मिळाले... झारखंडमधील तीन काँग्रेस आमदारांना 49 लाख रुपये बाळगल्या प्रकरणात अटक करण्यात आली... संजय राऊत यांच्यांकडे 11 लाख कॅश मिळाली... या बातम्यांमुळे आपण घरात किती कॅश व सोने ठेऊ शकतो, असा प्रश्न निर्माण झाला असेल. माहिती करुन घेऊ या यासंदर्भात काय आहे कायदा...
घरात आपण जे पैसे ठेवले आहेत, त्याचा सोर्स माहिती असणे गरजेचे आहे. घरातील रक्कमेचे पुरावे तपास संस्थांना द्यावे लागतात. नाहीतर 137 टक्के दंड आकारला जातो. 26 मे 2022 रोजी सीबीडीटीचा नवीन नियमानुसार वर्षभरात 20 लाखांपेक्षा जास्त रोकडेचा व्यवहार करता येत नाही.
घरात तुम्ही कितीही सोने ठेऊ शकता. फक्त घरात असलेल्या सोन्याचा पुरावा तुमच्याकडे असायला हवा. तपास संस्थांना सोने खरेदीचे बिल दाखवावे लागते. परिवाराकडून मिळालेल्या सोन्याचे पुरावे दाखवावे लागतात. जर तुम्हाला भेट म्हणून सोने मिळाले, असेल तर गिफ्ट डिल दाखवावे लागते.
कागदपत्र नसतांना किती सोने ठेवता येते
विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेऊ शकते
अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने ठेऊ शकते
विवाहित पुरुष 100 ग्रॅम सोने ठेऊ शकतो
अविवाहित पुरुष 100 ग्रॅम सोने ठेऊ शकतो.
काय होते शिक्षा?
आयकर कायदा 1961 नुसार उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जप्त केल्यास आरोपीस 4 ते 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
आर्थिक व्यवहार करतांना, कॅश ठेवतांना आणि सोने बाळगतांना तुम्हाला दक्षच राहावे लागेल. कारण कोणतेही बेकायदेशीर असलेली बाब लक्षात आली तर मोठी कारवाई होऊ शकते. यामुळे आपल्याकडे असलेली संपत्ती कायद्यानुसार आहे ना? याची खात्री करुन घेतलेली बरी...