विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेश

विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेश

महाराष्ट्रात काही दिवसांमध्ये विधानसभेच निवडणूकीच बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.
Published by :
shweta walge
Published on

महाराष्ट्रात काही दिवसांमध्ये विधानसभेच निवडणूकीच बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेत्यांचे दौरे, सभे सुरु आहेत. यातच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. इगतपुरीचे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

ऐन विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. इगतपुरीचे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत आमदार हिरामण खोसकर यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.

अजित पवार म्हणाले, आम्ही सगळ्यांनीच अनेक वर्ष सरकारमध्ये सरकारच्या बाहेर काम केलं. पाच वर्षांपूर्वी असेच निवडणुकीच्या काळामध्ये इगतपुरी मतदारसंघ हा आम्हाला काँग्रेसला द्यावा लागला. त्यावेळेस काँग्रेसकडे उमेदवार अधिक होते. परंतु त्याच्यातनं चर्चा झाली.हिरामण खोसकरांना पण मी चांगल्या पद्धतीने त्यांच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर या विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या करता मदत करत आलो आणि त्याच्यातलं संबंध वाढत गेले त्याच्यातून आपलेपणा त्या ठिकाणी निर्माण झाला. एक आदिवासी समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ता अशा प्रकारची हिरामणची ओळख आहे. शेवटी आपण समाजासहित ठेवून काम करतोय. एक चांगल्या प्रकारची भावना सतत मनामध्ये ठेवून आणि मतदारसंघातल्या सर्वांनाच सातत्याने मान सन्मान त्यांना रिस्पेक्ट देऊ, अस ते म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप हिरामण खोसकर यांच्यावर होता. काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यामुळे हिरामण खोसकर यांच्या अडचणीही वाढल्या होत्या. हिरामण खोसकर यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप असलेल्यांना काँग्रेसने तिकीट न देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच उमेदवारी मिळवण्यासाठी खोसकरांनी शरद पवारांनी भेट घेतल्याची चर्चा रंगली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com