Hingoli Idoli: ईडोळी गावात विद्यार्थ्यांनी साकारले इको फ्रेंडली गणराय

Hingoli Idoli: ईडोळी गावात विद्यार्थ्यांनी साकारले इको फ्रेंडली गणराय

उच्च न्यायालयाने पीयूपीच्या बाप्पांच्या मूर्ती वापरू नये अस आवाहन केलं आहे. याचपार्श्वभूमीवर हिंगोलीच्या इडोळी येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती साकारल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील सुरु झाली आहे. बापाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. बाप्पाच्या भल्या मोठ्या मूर्ती आजच्या तरुणाईसाठी आकर्षण बनल्या आहेत. अशातच या मोठ्या मोठ्या मूर्ती पीयूपीपासून तयार केलेल्या असतात. या मूर्ती विसर्जनाच्या वेळेस कशा ही प्रकारे विसर्जन केल्या जातात. याव्यतिरिक्त बाप्पाच्या मूर्ती पीयूपीच्या असल्यामुळे त्यापूर्णपणे विसर्जीतसुद्धा होत नाहीत. 12 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा, अर्चना केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन अशा प्रकारे केलं जात. याच गोष्टी टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने पीयूपीच्या बाप्पांच्या मूर्ती वापरू नये असं आवाहन देखील केलं आहे.

याचपार्श्वभूमीवर हिंगोलीच्या इडोळी येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती साकारल्या आहेत. इडोळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी साडूच्या माती पासून गणपती बनवले आहेत. तर इंडोळी येथील ग्रामपंचायत ठराव घेत संपूर्ण गावांमध्ये पर्यावरण पूरक गणपती मांडण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घातक रसायनामुळे पर्यावरणाला मोठा फटका बसतो हीच बाब लक्षात घेऊन येथील विद्यार्थ्यांनी तीनशे पर्यावरण पूरक गणपती बनवले आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन हिंगोलीच्या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्त्या साकारल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण सामाजात झाल्यास पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मोठी मदत होईल. यादरम्यान संपूर्ण गावात पर्यावरण पूरक गणपती बसवण्याचा घेतला गावकऱ्यांनी निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com