हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पाकिस्तानच्या नंबरवरुन धमकी
एक धक्कादायक बातमी समोल आली आहे. सातारा शहरातील पाच हिंदुत्ववादी आंदोलनकर्त्याना पाकिस्तान मधील मोबाईल नंबर वरून धमकी देण्यात आल्याच समोर आलं आहे. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा शहरातील पाच हिंदुत्ववादी आंदोलनकर्त्याना पाकिस्तान मधील मोबाईल नंबर वरून धमकी देणारे मेसेज आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. तुम्ही जे करत आहात ते थांबवा नाहीतर तुम्हाला उडवून देऊ अशी धमकी देणारे उर्दू आणि इंग्रजी भाषेतील मेसेज संबंधित युवकांना मोबाईल वरती आले आहेत.
त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे प्रकरण एटीएस कडे देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि भारताविषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्य पोस्ट केल्यानंतर 15 ऑगस्ट नंतर सातारा शहरात वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्याचे पडसाद 16 ऑगस्ट रोजी उमटले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामधील 5 जणांना पाकिस्तानच्या नंबरवरून धमकीचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे.