हेलिकॉप्टरमध्ये बिघाड पंकजा मुंडेंचे सभेला उपस्थितांना वर्चुअल मार्गदर्शन

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड पंकजा मुंडेंचे सभेला उपस्थितांना वर्चुअल मार्गदर्शन

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने पंकजा मुंडे यांची सभा वर्चुअल मार्गदर्शनाद्वारे पार पडली. बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा येथे धनंजय मुंडे यांच्यासोबत संयुक्त सभेत पंकजा मुंडे यांनी मोबाईलहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Published by :
shweta walge
Published on

बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा येथे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना या सभेला येता आलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मोबाईलहून उपस्थितांना वर्चुअल मार्गदर्शन केले.

पंकजा मुंडे शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान नाशिक मधील सभा आटोपून त्यांना धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी शिरसाळा येथे पोहोचायचे होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना पोहोचता आलं नाही. त्यामुळे त्यांनी मोबाईलहून वर्चुअल उपस्थितांना मार्गदर्शन केले. सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होतोय.

लोकसभा निवडणुकीत बहिणीच्या विजयासाठी धनंजय मुंडे यांनी जिल्हा पिंजून काढला होता. आता संपूर्ण महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा पंकजा मुंडे सांभाळत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com