Gujrat Rain: गुजरातमध्ये मुसळधार पावसाचे थैमान; सखल भागात साचलं पाणी, 'एवढ्या' जणांचा मृत्यू

Gujrat Rain: गुजरातमध्ये मुसळधार पावसाचे थैमान; सखल भागात साचलं पाणी, 'एवढ्या' जणांचा मृत्यू

गेल्या चार दिवसांपासून गुजरातमध्ये अविरत पाऊस पडत असून, सौराष्ट्र आणि कच्छमधील बहुतांश जिल्हे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

गेल्या चार दिवसांपासून गुजरातमध्ये अविरत पाऊस पडत असून, सौराष्ट्र आणि कच्छमधील बहुतांश जिल्हे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे प्रभावित झाले आहेत. कच्छ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे, मांडवीमध्ये 9 इंचांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, ज्यामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे.

जामनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या पिता-पुत्राचे मृतदेह आज एका दुःखद वळणावर सापडले. सोमवारपासून सुरू असलेल्या या पावसाने सुमारे 35 जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची बाजूची भिंत कोसळली. पुढील दोन दिवसांत सौराष्ट्र-कच्छमध्ये आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मोरबी, बडौदा, भरूच, जामनगर, अरवली, पंचमहल, द्वारका आणि दांग या जिल्ह्यात प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर आनंद जिल्ह्यात सहा, अहमदाबादमध्ये चार आणि गांधीनगर, खेडा, महीसागर, दाहोड आणि सुरेंद्रनगरमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com