Gadchiroli Rain
Gadchiroli Rain Team Lokshahi

Gadchiroli Rain : गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे धूमशान; ट्रक गेला वाहून

महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटींग सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्रात ( Maharashtra ) पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटींग सुरू आहे. गडचिरोली (Gadchiroli Rain) जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे.

या पावसामुळे गडचिरोलीत (Gadchiroli Rain) प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 3 जणांचे मृतदहे सापडले आहेत. हा ट्रक आलापल्लीवरुन भामरागडला जात होता, त्यावेळी ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

पेरमिली गावाजवळ एका नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पुलावरुन पाणी जातं असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र, पुलावरील पाणी ओसरु लागल्याचं बघून ट्रक ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली. मात्र, मध्यभागी पोहोचल्यावर लाकूड अडकल्यानं ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना मध्यरात्रीची असून, घटनेची माहिती मिळताच आज सकाळी SDRF च्या टीमने शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली.

Gadchiroli Rain
Amarnath Yatra : अमरनाथजवळ सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अडकला; रेस्क्यू ऑपरेशन सुरु
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com